Share

कुलदीप यादवने रिंकू सिंगच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल; KKR ने दिलं स्पष्टीकरण

🕒 1 min read

IPL 2025 च्या 48व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर खेळाडूंमध्ये गप्पा सुरू असताना कुलदीप यादवने रिंकू सिंगच्या कानाखाली मारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी बोलत असताना हा प्रकार घडला.

व्हिडीओमध्ये कुलदीप रिंकूला काहीतरी बोलत असताना अचानक त्याच्या कानाखाली मारताना दिसतो. रिंकूने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, मात्र नंतर तो संतापलेला दिसला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Kuldeep Yadav Slaps Rinku Singh After KKR vs DC Match

दरम्यान, या प्रकाराबाबत चर्चेला पूर्णविराम देत केकेआरने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कुलदीप आणि रिंकूच्या मैत्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत “Media (सनसनी) vs Reality (दोस्तीतला खरा भाव)” असे कॅप्शन देण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर निर्माण झालेला गैरसमज दूर झाला असून, हा वाद नसून दोघांमध्ये मस्करीचं नातं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 204 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने चांगली झुंज दिली, पण 14 धावांनी पराभूत झाली. फाफ डु प्लेसिस, अक्षर पटेल आणि विपराज निगम यांनी चमकदार कामगिरी केली.

महत्वाच्या बातम्या

YouTube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

A video of Kuldeep Yadav slapping Rinku Singh after the IPL 2025 match between KKR and DC goes viral; KKR clarifies it was just friendly banter.

Cricket India IPL 2025 Marathi News Sports