Share

मस्तच! शानदार ऑफरसह Google Pixel 8 Pro खरेदी करा, मिळतोय 45,000 रुपयांपेक्षा स्वस्तात

🕒 1 min read

Google Pixel 8 Pro । भारतात गुगलच्या सर्वच स्मार्टफोनला (Google Smartphone) चांगली मागणी आहे. त्यामुळे कंपनीदेखील आपले सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच काही दिवसांपूर्वी लाँच केलेला Google Pixel 8 Pro हा फोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.

तुमच्यासाठी अशी जबरदस्त ऑफर फ्लिपकार्टवर (Fliptcart offer on Google Pixel 8 Pro) मिळत आहे. तसेच आपल्याला बँक ऑफर देखील मिळत आहे. हा फोन तुम्ही बँक ऑफर आणि एक्झिट ऑफर देऊन 45000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. (Google Pixel 8 Pro offer)

Google Pixel 8 Pro offer

किमतीचा विचार केला तर गूगल पिक्सेल 8 प्रो भारतात 1,06,999 रुपयांना (Google Pixel 8 Pro Price) लाँच करण्यात आला. फ्लिपकार्ट या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनवर थेट 27,999 रुपयांची सवलत देत आहे, ज्यामुळे या फोनची किंमत 79,999 रुपये झाली आहे.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड व्यवहारावर 4,000 रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड व्यवहारावर 1,750 रुपये अतिरिक्त सवलत मिळेल. इतकेच नाही तर या फोनवर 62200 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुमच्याकडे आयफोन 13 असेल आणि आपण तो एक्सचेंज केला तर तुम्हाला गुगलचा फोन 45000 रुपयांना मिळेल.

Specifications and features of Google Pixel 8 Pro

Google Pixel 8 Pro हा ड्युअल-सिम स्मार्टफोन आहे, ज्यात Android 14 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळेल. या फोनमध्ये 120 हर्ट्झ 6.7 -इंचाचा QHD+ (1,344×2,992 पिक्सल) LTPO OLED डिस्प्ले मिळेल, जो 2400 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.

Google Pixel 8 Pro मध्ये तीन कॅमेरे असून यात OIS सह एक 50 मेगापिक्सलचा फेज-डिटेक्ट ऑटोफोकस वाइड शूटर, एक नवीन 48 मेगापिक्सलचा क्वॉड-PD अल्ट्रावाइड आणि तिसरा 30X सुपर-रेज डिजिटल झूमसह 48 मेगापिक्सलचा क्वॉड-PD 5 एक्स झूम कॅमेरा मिळेल. तसेच यामध्ये ऑटोफोकस सपोर्टसह 10.5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :

YouTube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

You can get such a great offer on Flipkart. You can also get a bank offer on Google Pixel 8 Pro.

Marathi News Mobile Technology

संबंधित बातम्या