Share

रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच, प्रवाशांचे होणार हाल

🕒 1 min read

मुंबई : मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) कल्याण–कर्जत मार्गावरील भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी बुधवार, ३० एप्रिलपासून रविवार, ४ मेपर्यंत दररोज रात्री रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत दररोज मध्यरात्री २ वाजल्यापासून ३.३० वाजेपर्यंत दीड तासांचा ब्लॉक राहणार असून, त्याचा परिणाम लोकल आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार आहे.

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतकडे रात्री १२.१२ वाजता निघणारी शेवटची लोकल बदलापूरपर्यंतच धावणार आहे. बदलापूर ते कर्जत दरम्यान ही सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच, कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे २.३० वाजता सुटणारी लोकलही बदलापूर येथून सुरू होईल, आणि बदलापूर–कर्जत दरम्यान ही लोकल रद्द राहणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ( CSMT to Karjat last night local curtailed till Badlapur due to night block )

Central Railway Night Block Between Kalyan and Karjat

दरम्यान, काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या जसे की भुवनेश्वर–सीएसएमटी एक्स्प्रेस, विशाखपट्टणम–एलटीटी एक्स्प्रेस, हैदराबाद–सीएसएमटी एक्स्प्रेस यांना कर्जत–पनवेल–दिवा मार्गे वळवण्यात आले आहे. या गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. कल्याण येथे थांबणाऱ्या गाड्यांना ठाणे आणि पनवेल येथे थांबा देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक प्रवास नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

YouTube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Central Railway announces night blocks between Kalyan and Karjat for infrastructure work; last local train services curtailed till Badlapur, impacting late-night commuters. commuters to face inconvenience till May 4.

Maharashtra Marathi News Mumbai Travel