🕒 1 min read
IPL 2025 च्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात शुबमन गिलने ( Shubman Gill ) आपला संयम गमावला. शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा गिल या सामन्यात मैदानावर संतापलेला दिसून आला. फलंदाजीदरम्यान 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गिल रनआऊट झाला. मात्र निर्णय वादग्रस्त ठरला. तिसऱ्या पंचाने दिलेल्या निर्णयामुळे गिल संतप्त झाला आणि त्याने थेट पंचांशी वाद घातला. यामुळे त्याचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. त्याने 38 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती.
Shubman Gill-Umpire Argument After DRS Drama in GT vs SRH
या वादाचा दुसरा भाग हैदराबादच्या डावात पाहायला मिळाला. प्रसिद्ध कृष्णाच्या 14व्या षटकात अभिषेक शर्मा एलबीडब्ल्यूसाठी अपीलनंतर नाबाद ठरला. गिलने रिव्ह्यू घेतला, मात्र बॉल ट्रॅकिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पष्ट चित्र समोर आलं नाही. केवळ इम्पॅक्ट आणि विकेटचा डेटा दाखवण्यात आला, परिणामी गुजरातला रिव्ह्यू गमवावा लागला. त्यामुळे गिल पुन्हा पंचांवर भडकला. यावेळी अभिषेक शर्माने हस्तक्षेप करत गिलला शांत होण्यास सांगितलं.
या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या दिशेने वाटचाल केली असून, हैदराबाद मात्र स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 10 पैकी 7 सामने गमावल्यामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्वप्न भंगले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय, हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- पंचांशी वाद, भावना व्यक्त करत शुबमन गिल म्हणतो, “कधी कधी भावना अनावर होतात”
- लाडकी बहीण योजनेतील २१०० रूपये कधी? मंत्री उदय सामंत यांचं मोठे विधान